गुहागर – जिल्हा परिषदेची शाळा भरली आहे….शाळेत विद्यार्थी आहेत. आणि त्याच विद्यार्थ्यांच्या सोबत चक्क बिबट्याचे पिल्लू शाळेमध्ये मुलांच्या सोबत बागडताना दिसत आहे. असा प्रकार घडलाय गुहागर तालुक्यातील उमराट येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत या शाळेतील विद्यार्थी बिबट्याच्या पिल्लासोबत खेळत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उमराट येथील जिल्हा परिषदेची ही शाळा या शाळेत चक्क शाळेची मुल बिबट्याच्या पिल्लाला खेळवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिबट्यांच्या पिल्लाला चक्क जिल्हा परिषद शाळा उमरट येथील मुलं बिबट्याच्या पिल्ला ला उचलून घेऊन शिक्षकाच्या समोरच खेळवत असल्याचा धक्का प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच बिबट्याच्या पिल्लाला खेळताना येथे आजूबाजूला जर एखाद्या मादी बिबट्या असेल तर त्या पिल्ला सहित त्या मुलाच्या ही जीवाला धोका असल्याचे म्हटले जाते आहे. हा सगळा प्रकार त्या शाळेच्या शिक्षकांच्या पुढ्यात होत असताना शिक्षक वर्ग मात्र मनोरंजन असल्यासारखं पाहत असल्याचा दिसत आहे. त्यामुळे हे शिक्षक अशावेळी बघ्याची भूमिका घेत असल्याची धक्क्यादायक बाब उघड झाली आहे. शिक्षकांना ही या विषयांचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. गुहागरमधील उमराठ जिल्हा परिषद शाळेतील घटना आहे. शिक्षकांच्या समोरच बिबट्याच्या पिल्लाला विद्यार्थी अंगावर खेळवत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणात आता वनविभाग तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग या प्रकारावरुन कोणती कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
बिबट्याच्या पिल्लाला खेळवताना एखाद्या शाळेतील मुलाचं जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न त्या निमित्ताने उभा राहिला.