गुहागर ; देवघर येथे आढळलेला तरुणाचा मृत्यू संशयास्पद पोलिसाकडून खुनाचा गुन्हा दाखल

0
841
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील देवघर येथे नदीकिनारी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. गुहागर पोलीस ठाण्यात तशी नोंदही झाली असून या तरुणाच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

आंबडस गवळवाडी येथील गणेश शिवराम माने हा तरुण १७ एप्रिल २०२४ रोजी आपली सासरवाडी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने गोपाळवाडी येथे माहेरी आलेल्या पत्नीला व मुलांना भेटण्यासाठी आला होता. यानंतर तो आंबडस या त्याच्या गावी परतला नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली.
यानंतर तशी बेपत्ता नोंद २४ एप्रिल रोजी खेड पोलीस ठाण्यात त्याच्या नातेवाईकांनी केली होती. यानंतर ३१ मे रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुहागर तालुक्यातील देवघर येथे एका नदी किनारी गणेश माने याचा मृतदेह १ जून रोजी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याच्या नातेवाईकांनी येथे प्रत्यक्ष येऊन पाहाणी केली असता, मृतदेहाची ओळख पटली. मृतदेहाचा १५ दिवसांचा कालावधी लोटल्याने तो रत्नागिरी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत. गणेश माने याच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे.

सदर तरुणाचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय. सध्या गुहागर आणि चिपळूणचे पोलीस याबाबत कसून तपास करत असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here