गुहागर – गुहागर तालुक्यातील देवघर येथील मंदिराजवळील एका ठिकाणी आज सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृत्यू नैसर्गिक आहे. आत्महत्या की घातपात आहे. याबाबत सध्या या परिसरात एकच चर्चा सुरू आहे.
गुहागर चिपळूण मार्गावरील देवघर येथील नदीच्या कडेला हा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह काही नागरिकांना दिसून आला. साधारण 30 ते 35 वय असलेल्या व्यक्तीचा हा मृतदेह असून पंधरा दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून या परिसरातील जर कोणी व्यक्ती हरवले असेल किंवा लापता असेल त्यांनी गुहागर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असा आवाहन करण्यात येत आहे. गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नलावडे , व त्यांचे सहकारी या ठिकाणी अधिक तपास करत आहेत.