गुहागर बोगस नोटा प्रकरण ; तालुक्यातील या नामवंत ग्रामपंचायत मधील सरपंचावर गुन्हा दाखल

0
2513
बातम्या शेअर करा

गुहागर – ( मंगेश तावडे ) – गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत शाखेतील एटीएममध्ये 500 रूपयांच्या तब्बल 80 नोटा बोगस सापडल्या आहेत. या प्रकरणी भरणा करणाऱ्या तालुक्यातील झोंबडी सरपंच अतुल अनंत लांजेकर यांच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली असून या परिसरात अशा बोगस नोटा पसरल्याची चर्चा सुद्धा या परिसरात सुरू आहे.

बैंक ऑफ इंडिया शृंगारतळी शाखेला लागूनच बाहेर एटीएम सेवा आहे. ज्यामध्ये पैसे काढताही येतात व पैशाचा भरणाही करता येतो. दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान, एटीएममध्ये पैशाचा भरणा करताना मशीनमध्ये अतुल लांजेकर यांच्या खात्यावर भरणा केलेल्या 40 हजार रुपये किमतीच्या 500 रुपये किमतीच्या एकूण 80 बनावट नोटा आढळून आल्या. या बनावट नोटा असल्याची अतुल लांजेकर यांना जाणीव असतानाही त्यांनी सदरच्या बनावट नोटा स्वतःकडे बाळगून त्या नोटा बँकेच्या कॅश डिपॉझीट मशीनमध्ये भरुन त्याचा वापर केल्याने फिर्यादी यांनी अतुल लांजेकर यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार 33/2024 भा.दं.वि. कलम 489 (ब) 489 (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास गुहागर पोलीस करत आहेत.

या प्रकाराबाबत मात्र सध्या गुहागर तालुक्यात एक वेगळीच शंका निर्माण केली जाते. एखाद्या एटीएम मध्ये किंवा बँकेत ज्यावेळेला आपण पैसे भरतो त्यावेळेला नकली नोटा ह्या बँकेत आणि एटीएम मध्ये ओळखल्या जातात असे असताना सुद्धा बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये नकली नोटांचा भरणा झालाच कसा ? असा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण झाला आहे. किंवा या प्रकरणात बँकेचा कोणी कर्मचारी सहभागी आहे का ? याची चौकशी सुद्धा पोलीस आणि करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here