गुहागर – गुहागर पोलीस स्टेशनचे प्रमोद पांडुरंग मोहिते यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर आज निवड करण्यात आली त्यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. आज गुहागर येथे महाराष्ट्र दिनी गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्यावतीने त्यांना हा आज मान प्रदान करण्यात आला.
प्रमोद पांडुरंग मोहिते हे 1988 साली पोलीस खात्यात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर. गडचिरोली अशा नक्षलग्रस्त भागात आपली सेवा बजावली विशेष म्हणजे त्यांनी शरद पवार हे संरक्षण मंत्री असताना त्यांचा बॉडीगार्ड म्हणून कामही केल आहे. गेली पाच वर्ष ते गुहागर येथे कार्यरत असून गुहागर तालुक्यातील वाहतूक नियंत्रण विभाग व्यवस्थितपणे सांभाळत आहेत त्यांच्यामुळे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेला मोठी शिस्तही लागली आहे. आज एक मे कामगार दिनी त्यांना पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती मिळाली असून त्यांचे नियुक्ती ठिकाणी गुहागरच ठेवले आहे. त्यांना मिळालेल्या या बढतीमुळे त्यांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.