गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतीलएका बिल्डींगमध्ये चालणाऱ्या जुगार अड्यावर गुहागर पोलिस निरिक्षक सचिन सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कारवाई केली आहे. या अड्ड्यावर तब्बल ६४ हजार १५० रूपयाचा माल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गुहागर पोलिसांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
शृंगारतळीतील एका बिल्डींगमध्ये जुगार अड्डा चालत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवस सुरू होतो. याच गोष्टीची खातरजमा झाल्यावर या सुरू असलेल्या जुगारावर पोलिस निरिक्षक सचिन सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाड टाकली. त्यावेळी जुगार खेळत असताना शृंगारतळी येथील अभी , मंगेश शेटे , मंगेश सीताराम गांधी , प्रमोद दळी , विश्वास बेलवलकर असे पाच जण या ठिकाणी जुगार खेळताना मिळून आले. यावेळी तब्बल ५१ हजार ८४० रोख रक्कम व इतर साहित्य मिळून ६४ हजार १५० रूपयाचा माल हस्तगत केला. गुहागर पोलिसांनी जुगार खेळताना मिळून आलेल्या या पाच जणांवर जुगार प्रतिबंधक कायदा ४ व ५ प्रमाणे पहाटे २ वाजता गुन्हा दाखल केला.
गुहागर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. चोरीछुपे चालणारा आबलोली येथील जुगार अड्डा आज दिवसभर बंद असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे गुहागर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.