चिपळूण नागरीच्या शाखांतर्गत प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा ; १५ संघ मैदानात उतरणार

0
46
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा अंतर्गत ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या प्रीमिअर क्रिकेट लीग स्पर्धेत १५ संघ मैदानात उतरणार असून चिपळूण बहादूरशेखनाका येथील सावरकर क्रीडा नगरी सज्ज झाली आहे. या मैदानात काही महिन्यांपूर्वी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित भव्य कृषी प्रदर्शन पार पडले होते. त्यानंतर आता या मैदानात क्रिकेटचे सामने रंगणार आहेत. यामुळे या मैदानाचे महत्त्व वाढले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

ही स्पर्धा ३० एप्रिल व १ मे रोजी प्रकाशझोतात होणार असून या स्पर्धेत १५ संघ मैदानात उतरणार आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर मध्य विभाग, सह्याद्री इलेव्हन पूर्व विभाग, डायमंड इलेव्हन फायटर, रत्नदुर्ग इलेव्हन दक्षिण विभाग, वाशिष्ठी इलेव्हन, पत्रकार इलेव्हन, लगान इलेव्हन फायटर, राजधानी इलेव्हन पश्चिम महाराष्ट्र, संचालक इलेव्हन, चिपळूण राईजर, पश्चिम विभाग इलेव्हन फायटर, योद्धा इलेव्हन उत्तर विभाग, चिपळूण नागरी इलेव्हन, फिटनेस क्लब इलेव्हन, चिपळूण वकील संघ असे या संघांचा समावेश आहे.

गेल्या काही वर्षांपासून ही स्पर्धा रंगतदार होत असून या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यावर्षी देखील ही स्पर्धा रंगतदार होणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघ‌ाला व उपविजेता संघाला आकर्षिक शिल्ड देण्यात येणार आहे. संस्थेच्या नाविन्यपुर्ण उपक्रमास क्रिडा रसिकांनी व संस्थेच्या चाहत्यांनी गेल्या वर्षी प्रमाणे उपस्थित राहुन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here