चिपळूण -चिपळूण मधील प्रसिद्ध अशा श्री हॉस्पिटल मध्ये एका गंभीर स्त्री रुग्णावर डॉ. वैभव जाधव यांनी गर्भाशयाला मोठी गाठ जी बेंबीच्या वरपर्यंत गेली होती. त्यांची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करुन ( Laparoscopic Surgery )
दोन वेळेस सिजेरियन व १० वर्षापुर्वी गाठ ( Uterine Fibroid ) काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया केली.
सदर रुग्णालाअति मासिक रक्तस्त्राव, खुप अशक्तपणाचा त्रास होत असल्याची तक्रार घेऊन उपचारा करीता दाखल झाला.अति मासिक रक्तस्त्राव असल्यामुळेच तिचे एच्.बी.देखिल कमी झाले होते.
डॉ. वैभव जाधव यांस तपासणी दरम्यान गर्भाशयाला मोठी गाठ जी बेंबीच्या वरपर्यंत गेली आहे असल्याचे निदर्शनास आले. डॉ.वैभव जाधव यांनी रुग्णांस रक्त चढवून त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला व सदर शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ( Laparoscopic Surgery ) केली.
शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करुन जवळ जवळ दिड किलोग्रॅम वजनाचे गर्भाशय गाठीसह काढण्यात यश आले .पुढील बाजुनी मूत्राशय चिकटले होते व मागील बाजूनी आतडी गर्भाशयास चिकटले होते. ही अतिशय किचकट व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया रूग्णास कोणत्याही प्रकारचा त्रास न होता डॉ. वैभव जाधव यांनी दुर्बिणीद्वारे ( Laparoscopic ) पार पाडली.