गुहागर – गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शृंगारतळी बाजरपेठेतील गोविंदा
मोबाईल मध्ये मोठी चोरी झाल्याची घटना घडली असून या मोबाईल दुकानातून सुमारे 30 लाखांचे मोबाईल चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ही चोरी माहितीगार चोरांनी केली असल्याचा संशय स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
गुहागर तालुक्यात काही दिवसांपूर्वी बोगस नोटा सापडल्या पोलीस त्या प्रकरणाचा तपास करत असतानाच पुन्हा एकदा चोरट्याने मध्यवर्ती ठिकाणी चोरी करून गुहागर पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिल्याचं या घटनेत दिसून येत आहे. या चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ रत्नागिरीतून श्वान पथक मागवले रत्नागिरीतून श्वान माही व त्याचा हस्तक सुदेश सावंत हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच रत्नागिरीतून ठसे तज्ज्ञांची टिमही दाखल झाली असून रत्नागिरी जिल्हा पोलीस उपअधीक्षक जयश्री गायकवाड उपविभागी पोलीस अधिकारी राजमाने हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत..
शृंगारतळी मधील बाजारपेठेत राहुल शेटे यांची ही गोविंद मोबाईल शॉपी असून या मोबाईल शॉपीवर रात्री एक ते चार च्या दरम्यान तीन अज्ञातांनी चोरी केल्याची माहिती उपलब्ध झाली असून गुहागर पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे. अद्याप पंचनामा जरी झाला नसला तरी या चोरीने मात्र गुहागर पोलिसांना समोर एक नवीनच आव्हान उभे केले आहे. आता गुहागर पोलीस या चोरीचा तपास कसा लावतात याकडेच सर्व तालुक्याचे व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.