श्री मल्टीस्पेशियालिटी हॉस्पिटल ; दोन्ही गुडघ्यांची यशस्वी कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

0
73
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील रुग्णांसाठी सातत्यपुर्ण वैद्यकीय सेवा सुविधा देण्याचे काम “श्री हॉस्पिटल” गेले दशकभर करीत आहेत. महानगरीय सोयीसुविधांनी सुसज्ज असणाऱ्या ” श्री मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटल ” मध्ये काल ७० वर्षाच्या वृद्ध महिलेच्या दोन्ही गुडघ्यांची सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली व शस्त्रक्रियेनंतर अवघ्या ८ तासांमध्ये रुग्ण स्वतःच्या पायांवर उभा राहून वॉकरच्या साहाय्याने चालू देखील लागला, समाजातील सर्व स्तरावरून श्री मल्टीस्पेसिलिटीच्या डॉक्टरांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रख्यात अस्थिविकार तज्ज्ञ मणक्याच्या , सांधा व खुब्याच्या शस्त्रक्रिया करणारे डॉ. नोमान अत्तार यांनी हि शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली आहे. ह्या शास्त्रक्रियेबद्दल माहिती देत असताना डॉ . नोमान अत्तार म्हणाले कि रुग्णांच्या शस्त्रक्रिये दरम्यान पारंपरिक सांधेरोपण शास्त्रक्रिये दरम्यान साधारणपणे २० ते २५ से. मी . चा छेद घेतला जातो . पण आपण या महिलेच्या शस्त्रक्रियेमध्ये नवीन (SUBVASTUS APPROACH) सब-वास्ट्स अप्रोच पद्धतीचा वापर केला आहे. ह्या पद्धतीतील फायदे सांगत असताना डॉ . नोमान अत्तार म्हणाले कि ह्या पद्धतीमध्ये रुग्णांच्या शस्त्रक्रियेच्या जागेवर ८ ते १० से. मी. चा एक लहान छेद देण्यात येतो ह्याला (MINIMALLY INVASIVE) असे म्हणतात , ह्या पद्धतीमुळे रुग्णांच्या स्नायूंना- मासपेशींना कमी इजा होतात. (SUBVASTUS APPROACH ) सब-वास्ट्स अप्रोच सांधेरोपण पद्धतीमुळे स्नायूंना, मासपेशींना झालेली इजा लवकर भरते आणि लहान छेदांमुळे रुग्णांमध्ये सुधारणा लवकर होते. शस्त्रक्रिये पश्चात / नंतर होणाऱ्या वेदना हि कमी होतात व रुग्ण एक आठवड्यातच चालू शकतो व दोन ते तीन महिन्यात पूर्ववत हिंडू फिरू शकतो आणि महत्वाचे म्हणजे आपला गुढघा दुमडू हि शकतो. ऑपरेशन नंतर लागणारे औषधे आणि होणाऱ्या वेदना हि कमी असतात. अशा प्रकारच्या आधुनिक आणि विकसित तंत्र न्यानाचा आणि पद्धतींचा उपयोग जास्तीक जास्त आपल्या चिपळूण शहरातल्या लोकांना व्हावा असे डॉ नोमान अत्तार यांचे म्हणणे आहे

” श्री मल्टीस्पेसिलिटी हॉस्पिटल”मध्ये सुसज्ज( LYAMINAR OT )शस्त्रक्रिया विभाग आहे. अशा प्रकारच्या महत्वाच्या शस्त्रक्रिया मध्ये रुग्णांना कोणत्याही प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता अजिबात नसते .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here