चिपळूण ; बीडीओंसहित तिघांवर गुन्हा दाखल ,विनयभंगाच्या तक्रारीनंतर पोलिसांची कार्यवाही

0
1090
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या एका महिलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज पाठवून सातत्याने त्रास देणाऱ्या त्याच विभागातील एका लिपिकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय खामकर असे त्याचे नाव असून याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी त्याच्यासह या प्रकरणात संबंधित महिलेला न्याय देण्यास सहकार्य न केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी उमा घारगेपाटील आणि पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अविनाश जाधव अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार पाणीपुरवठा विभागातील लिपिक खामकर हा सप्टेंबर महिन्यापासून संबंधित महिलेच्या व्हाट्सअप वर सातत्याने मेसेज टाकत होता. आणि संबंधिताला भेटून शिवीगाळही केली होती. असे त्या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार चिपळूण पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फिर्यादी महिलेने येथील चिपळूण गटविकास अधिकारी उमा घारगेपाटील यांच्याकडे रीतसर तक्रार केली होती. मात्र त्यांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. जर तू तक्रार दिली तर तुला कामावरून काढले जाईल अशी धमकी दिली त्यामुळे पोलिसांनी बिडीओ विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. तर उपअभियंता अविनाश जाधव हे आपल्याला नेमून दिलेले काम न देता जास्त वेळ थांबून घेऊन वेगळेच काम देत होते. अशी तक्रार पोलिसात केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास येथील पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे करीत आहेत.

एका महिलेने एका महिला अधिकाऱ्याजवळ तक्रार करून सुद्धा त्या महिला अधिकाऱ्याने संबंधित महिलेला न्याय देण्यास असमर्थता दर्शवल्याने… व संबंधित महिलेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिल्याने… त्या महिला अधिकाऱ्याची चौकशी व्हावी व संबंधित महिला अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी चिपळूण मधील महिलांकडून केली जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here