गुहागर – राज्यात नवे २२ जिल्हे आणि ४९ तालुके
निर्मितीचा प्रस्ताव असून रत्नागिरी जिल्ह्यातून मंडणगड जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. मंडणगड जिल्हा झाल्यासदापोली, खेडसह रायगड जिल्ह्यातील लगतचे तालुके मंडणगडला जोडण्यात येणार आहेत. या प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त
आहे.
२०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुख्य सचिवांच्या
नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या
मागण्यांचा अभ्यास करण्यात आला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने महाराष्ट्रात नवे २२ जिल्हे आणि ४९ नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होते. मोठमोठ्या जिल्ह्यांचे विभाजन, त्रिभाजन करुन हे नवे जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव होता.
या प्रस्तावानुसार, ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण, पालघर जिल्ह्यातून जव्हार, रायगड जिल्ह्यातून महाड तर रत्नागिरी जिल्ह्यातून महाड या नव्या जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर मंडणगड हा तालुका रत्नागिरी जिल्ह्यापासून खूपच दूर आहे. शासकीय
कामकाजासाठी मंडणगड, दापोली, खेड या तालुक्यातील नागरिकांना रत्नागिरीला जाणे खूपच अवघड होते. त्यामुळे मंडणगड जिल्हा या तालुक्यांना तसेच रायगड जिल्ह्यातील मंडणगडला लागून असलेले तालुके नव्या मंडणगड जिल्ह्यामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडणगड जिल्हा झाल्यास वरील तालुक्यांना कामकाजासाठी जवळचा मंडणगड वरदान ठरणार आहे.