मी दाऊदचा माणूस आहे, धावत्या हरणीलाही मारतो, तुमची ही शेवटची सभा…… त्यांनी दिला महिलाना दम…

0
701
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील पेवे ग्रामपंचायतची विशेष सभा संपल्यानंतर मुंबईहून सुमारे पाच वर्षांनी आलेल्या एका ग्रामस्थाने दोन साथीदारांच्या सहाय्याने पेवे ग्रामपंचायत मधील दोन महिला सदस्यांना धमकी दिली. मी दाऊदचा माणूस आहे,धावत्या हरणीला मारतो तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही. तुमची हि शेवटची सभा आहे. अशा शब्दात धमकी दिली.

पेवे ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा संपल्यानंतर सायंकाळी ४.०० च्या दरम्यान संशयित आरोपी शौकत महम्मद खान, मुनाफ युसुफ खान व निलेश मुरलीधर कीर यांनी तेथील दोन महिला सदस्यांना धमकावले असल्याचे याच महिलांनी गुहागर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
सदरहू तक्रारीमध्ये यातील शौकत महम्मद खान यांनी आपल्या दोन साथीदारांच्या सहाय्याने महिला सदस्यांना माझे डोके गरम आहे, मी मागेपुढे पाहत नाही, महिला असो कि पुरुष असो, मी दाऊदचा माणूस आहे,धावत्या हरणीला मारतो तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही. तुमची हि शेवटची सभा आहे. असे धमकावून अश्लील भाषेत शिवीगाळही केली म्हणून महिला सदस्यांनी गुहागर पोलीस स्थानकात धाव घेतली. सदरहू गुन्हा रजिस्टरमध्ये दाखल करण्यात आला. भारतीय दंड सहिता १८६० नुसार ५०९,५०६,३४ कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या आदेशाने पो.हे.कॉ. नलावडे करीत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here