गुहागर ; ४८ स्मार्ट अंगणवाड्यांचे वीजमीटर कट

0
138
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील १४३ पैकी ४८ स्मार्ट अंगणवाडी इमारतींची वीजमीटर जोडणी तोडण्यात आली आहे. केवळ २८ अंगणवाड्यांचा वीजपुरवठा सुरळीत असून ९ अंगणवाड्यांची वीज सोलरवर सुरु आहे. तसेच मागणी असूनही ५८ अंगणवाड्यांना वीजजोडणीच देण्यात आलेली नसल्याने तालुक्यातील बहुतांश अंगणवाड़्या अंधारात आहेत.

राज्य शासन एकिकडे अंगणवाड्या स्मार्ट व डीजिटल बनविण्यासाठी आग्रही असून त्यांना भरीव निधीही उपलब्ध होत आहे. कित्येक ठिकाणी अंगणवाड्या तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, वीजेअभावी त्या अंधारात असल्याचे दिसून येत आहेत. कित्येक अंगणवाड्यांमध्ये एलसीडी टी.व्ही. बसविण्यात आला आहे.
मात्र, वीजेअभावी हा संच धूळखात पडला आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून वीजजोडणीबाबत कोणतीही खर्चाची तरतूद नसल्याने वीजबील भागविण्यापासून अन्य
खर्च लोकसहभागातूनच उभा करावा लागतो. काही अंगणवाड्यांना संबंधित ग्रामपंचायती आर्थिक सहकार्य करतात मात्र, कित्येक गावांमध्ये ग्रामपंचायतीची वीजबील भरण्यासाठी अंगणवाड्यांना सहकार्य करत नसल्याचे
दिसून येत आहे.

गुहागर तालुक्यात १४३ अंगणवाड्या आहेत. बहुसंख्य अंगणवाड्या स्मार्ट व डीजीटल झालेल्या आहेत. असे असले तरी वीजबील भरण्याची आर्थिक स्थिती नसल्याने ४८ अंगणवाड्यांची वीजजोडणी तोडण्यात आली असून अशा अंगणवाड्या
वीजेअभावी अंधारात आहेत. दुसरीकडे मात्र, उलट स्थिती आहे. तालुक्यातील ५८ अंगणवाड्या वीजेच्या प्रतिक्षेत असून त्यांना अद्याप जोडणी देण्यात आलेली नाही. केवळ २८ अंगणवाड्यांचा वीजपुरवठा सुरळीत असून ९ अंगणवाड्या सोलरवर सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, सरकारकडून अंगणवाड्यांच्या विकासासाठी निधी दिला जातो मात्र, वीजजोडणीबाबत उदासिनता दाखवली जात आहे. लोकसहभागातून निधी मिळवणे प्रत्येकवेळी ग्रामीण भागात शक्य होत नाही. अशावेळी आर्थिक तरतूद होणे
आवश्यक असून संबंधित ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी आर्थिक सहकार्य करणे आवश्यक असल्याचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here