…….’या’ कारणाने त्याने केले पत्नीवरच ब्लेडने वार

0
259
बातम्या शेअर करा

वाई -(प्रवीण गाडे)- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामधील पसरणी येथे फोन न उचलण्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर ब्लेडने जवळपास ७ ते ८ वार केल्याची धक्कादायक घटना घडली असून याप्रकारणी प्रियांका येवले यांनी पती राहुल येवले याच्याविरुद्ध वाई पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की राहुल येवले हा वाई येथे एका कंपनीत नोकरीस आहे. संध्याकाळच्या वेळी त्याने पत्नी प्रियांका हिस फोन केला असता उचलला नाही म्हणून घरी आल्यावर वाद घातला. सकाळी कामावर जाताना पुन्हा त्यावरून वाद झाला आणि राहुलने तिच्या मानेवर व मनगटावर ब्लेडने ७ ते ८ सपासप वार केले. त्याप्रकरणी त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस नाईक श्रीनिवास बिराजदार करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here