अमेरिकेतील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) अनुज साळवी”याची निवड.

0
221
बातम्या शेअर करा

गुहागर – अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (Pune) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात 26 ऑगस्ट 2023 घेण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेमध्ये “कु.अनुज संदेश साळवी” याची निवड झाली आहे.

भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने ही परीक्षा 26 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात आली. युएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अँबेसेडर व स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार म्हणाल्या, “स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये इ. 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात आली. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका होती. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका होत्या. यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून, येणाऱ्या पिढीसाठी हे महत्वाचे आहे.” नोव्हेंबरमध्ये युएस स्पेस अँड रॉकेट सेंटर, हन्टस्वीले, अल्बामा येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नेण्यात येईल. अमेरिकेतील स्पेस कॅम्प, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऑरलॅन्डो या ठिकाणीही विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात येणार आहे. त्यांचा सर्व खर्च संस्थेमार्फत केला जाणार आहे.”
स्वान फाउंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलचे संचालक एम. तिरुमल म्हणाले, “आज पालक आपल्या मुलाने अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी व्हावे, याकरिता अनेक प्रयत्न करताना दिसतात. परंतु ही परीक्षा अंतराळ एज्युकेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असेल.”

“आज संपूर्ण जग विकासाच्या वाटेवर आहे. माणूस पृथ्वीपुरताच मर्यादित न राहता अवकाशातही प्रवास करू लागला आहे. चंद्र, मंगळ हे ग्रह तर मानवाच्या अगदी ओळखीचे झाले आहेत. अंतराळासंबंधित प्रयोग, अभ्यास आणि संशोधन हे प्रत्येक देश स्वतःच्या पद्धतीने करत असतो. संबंधित संशोधनासाठी अनेक देशांनी स्वतःची अंतराळ संस्था (Space Agency) तयार केली आहे.

जगातील 195 देशांपैकी फक्त 72 देशांकडे स्पेस एजन्सी आहेत. ‘नासा’ ही त्यापैकी सर्वांत सुप्रसिद्ध एजन्सी आहे. तीस वर्षांपूर्वी डॉ. वॉन ब्राऊन यांनी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच खगोलशास्त्रात रुची निर्माण व्हावी आणि या माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवता यावीत, यासाठी यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटर सुरु केले.”

निवड चाचणी परीक्षेमध्ये नवोदय विद्यालय रत्नागिरी विद्यालाचा “ अनुज संदेश साळवी” याची निवड झाल्याबद्दल २ सप्टेंबरला पुणे येथे स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने सत्कार होणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here