कॉलिटी बेकरीचे पदार्थ विकत घेत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी……

0
3399
बातम्या शेअर करा

गुहागर – चिपळूण व गुहागर तालुक्यात प्रसिद्ध असणाऱ्या कॉलिटी या बेकरीचे जर आपण पदार्थ हक्काने घेत असाल तर सावधान ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

कॉलिटी बेकरी ही नावाप्रमाणे कॉलिटीचे पदार्थ देते. मात्र गेल्या अनेक दिवसापासून गुहागर आणि चिपळूण परिसरात या कॉलिटी बेकरीचे इंग्लिश ब्रेड नावाने एक ब्रेड पॅकेट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. या ब्रेड ब्रॅकेटवर जर आपण निरखून पाहिलं तर ब्रेड ज्या दिवशी तयार होतो. त्याची तारीख कशाप्रकारे टाकली जाते..? आणि बारीक अक्षरात हा ब्रेड किती दिवस खाण्यासाठी लायक आहे किंवा वापरावा याची माहिती टाकली जाते. मात्र या ब्रेड बाबत भयानक असा प्रकार गुहागर तालुक्यात उघड झालाय कॉलिटी बेकरीचा हा इंग्लिश ब्रेड चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली येथील एमआयडीसी मध्ये तयार होतो. या ब्रेडवर असलेली तारीख खोडून तो ब्रेड विकत असल्याचा प्रकार गुहागरमध्ये उघडकीस आलाय. याबाबत कॉलिटी बेकरीच्या कस्टमर केअर वर संपर्क साधला असता काही कालावधीतच या क्वालिटी ब्रेकच्या मालकांचा फोन आम्हाला आला व त्यांनी घडलेला सर्व प्रकार आम्हाला सविस्तर विचारला ज्या व्यक्तीने हा ब्रेड विकत घेतला होता त्या व्यक्तीने तो ब्रेड व त्याबाबत घडलेला सर्व प्रकार मालकांना सांगितला त्यावेळी ही आमच्याकडून चूक झाली आहे. तुम्ही आम्हाला यावेळेस माफ करा असं सांगून मालकांनी फोन ठेवून दिला… आता प्रश्न असा आहे.

ज्या कॉलिटी बेकरीवर तमाम चिपळूणकर , गुहागर तालुक्यातील सर्व गावातील नागरीक जे विश्वासाने व हक्काने पदार्थ विकत घेतात त्या खवय्यांचं काय..? त्यांनी या क्वालिटी बेकरीवर आता विश्वास कसा ठेवायचा.?… असा प्रश्न सर्वसामान्य खवय्यांना पडला आहे. कॉलिटी बेकरी की नावाप्रमाणे कॉलिटीचे पदार्थ देण्यासाठी प्रसिद्ध आहे. मग त्या बेकरीतून असा प्रकार घडतोच कसा..? याबाबत सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत काही ग्राहक रत्नागिरी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचा सुद्धा समजते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here