चिपळूण — चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था गेली २५ वर्षे अखंडीतपणे सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी एकमेव पतसंस्था आहे. संस्थेची या पद्धतीने कार्यपद्धती असून या कार्यपद्धतीला ताकद देण्याचे काम सभासदांनी केले आहे, असे प्रतिपादन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी केले. पहिल्याच दिवशी संस्थेने सभासदांना ५३ लाखांचा लाभांश वाटप केले.
ही वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सहकार भवन सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले व मंजुरी जमा-खर्चास मंजुरी घेण्यात आली. एकंदरीत सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण म्हणाले की, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक व्यावसायिकता सांभाळीत असतानाच लोकोपयोगी उपक्रमाला देखील प्राधान्य दिले आहे. संस्थेने लोटे औद्योगिक परिसरानजीक ग्रामीण घरकुल योजना राबवली या योजनेअंतर्गत चार ते पाच वसाहती उभ्या केल्या आहेत. यामुळे या लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी अर्थ पुरवठा करण्याबरोबरच शेती पूरक दुग्ध व्यवसायासाठी देखील शेतकऱ्यांना अर्थ पुरवठा केला आहे. यामुळे या सर्वांच्या उदरनिर्वाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. चिपळूण नागरी गेली २५ वर्ष अखंडितपणे सभासदांना १५ टक्के लाभांश देणारी एकमेव पतसंस्था आहे. या पद्धतीने संस्थेची कार्यपद्धती असून या कार्यपद्धतीला ताकद देण्याचे काम सभासदांनी केले आहे. सहकार खात्याच्या निर्देशानुसार सहकार प्रशिक्षण संस्था म्हणून आपल्याला काम करायचे आहे. सर्वसामान्यांमध्ये सहकार संदर्भात जनजागृती करायची आहे. ही जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचे सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वाशिष्टी डेअरीचे संचालक व उद्योजक प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून स्थानिकांना रोजगार मिळावा व येथील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी वाशिष्टी डेअरी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पतसंस्थेच्या कामकाजासाठी ज्यावेळी वरिष्ठ स्तरावर जावे लागते. त्यावेळेस संस्थेचा रिपोर्ट पोहोचलेला असतो. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामाचे कौतुक करून आपले घर सांभाळून संस्थेचे कामकाज योग्यरीत्या पार पाडत आहेत. त्यांच्याबरोबर असणारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे यादव यांनी कौतुक केले.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2023/08/IMG-20230814-WA0078-1024x682.jpg)
तसेच यावेळी सभासद कृष्णा खांबे, सुनील टेरवकर, सुनील सुर्वे, सुरेश साळवी, प्रकाश शिंदे, मामा जाधव, सरकारी ऑडिटर श्री. गीते, अविनाश आंब्रे, संतोष भडवळकर, मानसिंग महाडिक या सर्वांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. संस्थेने आर्थिक व्यावसायिकता सांभाळीत असतानाच लोकोपयोगी उपक्रमाला देखील नेहमीच सहकार्य केले आहे. यामध्ये संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले.
यावेळी उद्योजक प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक अशोकराव कदम, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, एडवोकेट नयना पवार, सत्यवान महामुनकर, गुलाब सुर्वे, सोमा गुडेकर, मनोहर मोहिते, राजेश वाजे, रवींद्र भोसले, प्रकाश साळवी, प्रमोद साळवी, प्रकाश पत्की, नीलिमा जगताप, राजेंद्र पटवर्धन आदी उपस्थित होते. तर ही वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.