गुहागर – पूर्वी एक खूप प्रचलित म्हण होती गाव करील ते राव करील काय..? याच म्हणीला अनुसरून गुहागर तालुक्यातील देवघर या ठिकाणी एक चांगले कार्य गावातील तरुण युवकांनी आणि बुजुर्ग मंडळींनी एकत्र येत बस थांब्यावर श्रमदानातून आज बस थांबा उभारला त्यामुळे या सर्वच तरुण युवकांचं आणि गावकऱ्यांच सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

गुहागर -चिपळूण मार्गावरील देवघर हे गाव या ठिकाणी शासनाचे जुने असं पिकप शेड आहे. मात्र ती सध्या पडीक अवस्थेत असल्याने त्याचा वापर होत नाही. मात्र याच देवघर गावातील बस स्टॉप साठी घोसाळकर यांनी मोफत शेड दिली त्यानंतर ती शेड कशी उभी करायची याबाबत चर्चा झाली….. यावेळी गावातील तरुणांनी एकत्र येत आज या स्वातंत्र्यदिनानिमित्त श्रमदान करत ती पिकप शेड उभी केली. गावातील तरुणांचं आणि गावकऱ्यांच्या त्यामुळे सध्या सर्वत्र कौतुक होते त्याचप्रमाणे घोसाळकर यांनी जी मोफत शेड दिली त्यांचाही कौतुक केले जात आहे.