चिपळूण ; मी अजित पवार यांच्यासोबत – आमदार शेखर निकम

0
285
बातम्या शेअर करा

चिपळूण – नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार यांना सोडणे शक्य नाही. त्यामुळे मी अजित पवार यांच्या बरोबरच ठाम राहाणार. यावेळी पक्का निर्णय घेतला आहे. होणाऱ्या परिणामांचा विचार केलेला नाही, असे स्पष्ट मत चिपळूण-संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी व्यक्त केले.


राष्ट्रवादीचे नेते व माजी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून पक्षाच्या काही आमदारांना बरोबर घेत शिंदे सरकारला पाठिंबा दिला आणि ते उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. हे वृत्त चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव शेखर निकम हे आमदार आहेत. कोकणामध्ये रायगडमधून आदिती तटकरे व चिपळूण-संगमेश्वरमधून निकम असे दोनच आमदार असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता होती. त्यात आदिती तटकरे यांना मंत्रिपदाची शपथ मिळाल्याने आ. शेखर निकम यांची भूमिका काय? या बाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आज पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. तोपर्यंत कुणाला काहीच कल्पना नव्हती. प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबाबत ही बैठक असेल असे वाटले होते. त्या निमित्ताने सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. मात्र, त्यानंतर पुढचा सर्व प्रकार समोर आला. यावेळी मात्र आपण काळजावर दगड ठेवून अजित पवारांना साथ देण्याचे ठरविले आहे. मागच्यावेळी आपण विरोधी भूमिका मांडली आणि सुदैवाने त्या वेळेची राजकीय समीकरणे जुळली नाहीत आणि अजित पवार पुन्हा आमच्यात राहिले. मात्र, त्या वेळेचा रोष दूर करण्यासाठी आता आम्ही दादांबरोबरच राहाण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. आता त्यांना तोंडावर पाडायचे नाही, असे ठरविले आहे. शेवटी राज्यातले नेते म्हणून अजित पवारच आहेत. आता ते उपमुख्यमंत्री झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कसे जाणार? कदाचित उद्या ते मुख्यमंत्रीही होतील. त्यामुळे आपण दादांबरोबरच राहाणार असा ठाम निर्णय घेतला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here