लांजा – -आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना आपली तयारी सुरु केली आहे. राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची चाचपणी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे.शिवसेनेदेखील (शिंदे गट) आपल्या महत्त्वाच्या नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसे सुतोवाच दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित केला असल्याची यामुळे चर्चा सुरु झाली आहे. लांजा येथील कार्यकर्ता मेळाव्यात उदय सामंत यांनी लोकसभा निवडणूक, उमेदवारीबाबत मोठे विधान केलेउदय सामंत म्हणाले की, माझे शासकीय निवासस्थान मुंबईत सध्या मुंबई आहे. पण ते दिल्लीत देखील असले पाहिजे. आपल्या मोठ्या बंधूंच्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं आहे.
त्यामुळे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आगामी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.