चिपळूण – कोकणातील सह्याद्री खोऱ्यातील नांदीवसे गावातील..भला मोठा डोंगर आणि त्यात वसलेले हे दीड हजार लोकवस्तीच राधनगर..हे सध्या पावसात भीतीच्या छायेखाली जगत आहे..कारण ज्या डोंगराच्या पायथ्याशी लोकवस्ती आहे.
आता त्याच डोंगराला वरच्या बाजूने मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत..दोन वर्षापूर्वी कोकणातील पावसाळ्यात महाडमधील तळीये आणि रत्नागिरी खेड मधील पोसरे येथे डोंगर,दरड खाली सरल्याने त्यात अनेकांचा मृत्यु झाला होता..या जखमा ताज्या असतानाच आता राधानगर येथील डोंगराला पहिल्याच पावसात भेगा गेल्या आहेत..गेली दोन वर्ष या डोंगराला ठिकठिकाणी भेगा जाऊन डोंगर खचतोय..या पडलेल्या भेगांमध्ये पावसाचे पाणी आत गेल्याने या भेघांची तीव्रता अधिकच वाढत आहे..त्यामुळे या डोंगराच्या भागांतील वस्तीला धोका निर्माण झालाय..