चिपळूण – मुंबई-गोवा महामार्गावर बहाद्दूरशेख नाका ते कळंबस्ते दरम्यान असणारा ब्रिटिश कालीन वाशिष्ठी नदीवरील पुलांची मुदत संपल्याने ते कालबाह्य झाले आहेत. या पुलाला तडे गेले आहेत. या पुलावरून अवजड वाहतूक करताना हे पुल हलतात. पुलाच्या खालचा स्लॅबही उखडला आहे.त्यातच वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली की या पुलावरील वाहतूक खबरदारी म्हणून बंद केली जाते. सध्या कोकणात पाऊस खूप आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याने पावसाळ्याच्या हंगामात या पुलावरील अवजड वाहतूक बंद करून धोका टाळावा अशी मागणी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी एका निवेदनाद्वारे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.
गेली 3 वर्षांपासून या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू आहे. मात्र तर अध्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे येथील नवीन पुलाचे काम त्वरित करून जुन्या पुलावरील वाहतूक त्वरित थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/07/Screenshot_20200720_095059-1024x473.jpg)
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2020/07/IMG_20200720_095658-1024x591.jpg)