बातम्या शेअर करा

चिपळूण – पावसाळ्यापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील एक लेनचे काम पूर्ण होईल,असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री पालघर व सिंधुदूर्ग रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.आज वाकेड ते कशेडी या दरम्यानच्या मुंबई गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली.

दौऱ्यादरम्यान महामार्गावरील कामाचा आढावा घेताना ते म्हणाले.
यावेळी मंत्री महोदयांचा समवेत माजी आमदार प्रमोद जठार, डॉ. विनय नातू, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे,रवींद्र नागरेकर, अनिकेत पटवर्धन आदी तसेच राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हयातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाच्या पाहणी दौऱ्याला राजापूर येथुन प्रारंभ केला. राजापूरात त्यांनी तळगाव ते राजापूर व पुढे वाकेड अशी पाहाणी केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील कांटे ते आरवली,आरवली ते चिपळूण,चिपळूण ते परशुराम घाट,परशुराम घाट ते कशेडी घाट ची येथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला व पाहणी केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here