वाई : धक्कादायक ! ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या : सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

0
557
बातम्या शेअर करा

वाई – वाईतील गॅलक्सी माेबाईल शाेरुम मधील कर्मचाऱ्यान राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडलीये. याप्रकरणी समीर रशीद बागवान व यांनी वाई पोलीसात तक्रार दिलीय.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की सिकंदर अमीन अतार वय वर्ष ३० मुळ रा औंध ता खटाव सध्या रा. मधली आळी सिद्धिविनायक अपार्टमेंट वाई यान राहत्या घरातच दोरीच्या साह्यान गळफास लावून घेत आपली जीवन यात्रा संपवली. सिकंदर शेख हा गॅलक्सी माेबाईल शाेरुम मध्ये नोकरीला होता. ताे दि. १६ मे पासूनच गायब होता. तसेच त्यान आत्महत्या करणार असल्याच बऱ्याच जणांकड माेबाईल व्दारे सांगितल्याच घटणास्थाळावरील प्रत्यक्षदर्शींकडून बोललं जातंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून आत गेल्यानंतर मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनेची नोंद पोलीसात झाली असून आत्महत्येच कारण मात्र कळू शकलं नाही. घटनेचा पुढील तपास एपीआय आशिष कांबळे करतायेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here