रत्नागिरी – कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्यांना एक चांगली बातमी आहे. कोकणात आता वंदे भारत एक्स्प्रेसने जाता येणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावरुन वंदे भारत एक्स्प्रेस धावली आहे. मुंबईपासून गोव्याच्या दिशेने करण्यात आलेली प्राथमिक चाचणी यशस्वी ठरली आहे. आता गोव्याहून ही एक्स्प्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने धावणार आहे. तेव्हा लवकरच कोकण रेल्वेवरही वंदे भारत धावताना दिसू शकेल. आता राज्यात मुंबई-शिंर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर वंदे भारत धावत आहे. आता कोकण रेल्वे मार्गावर ही नवी कोरी गाडी धावणार आहे. त्यामुळे प्रवास एकदम आरामदायी होणार आहे.
मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी हायस्पीडमध्ये रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी घेतली गेली आहे. मुंबई ते मडगाव मार्गावर आज मंगळवारी यशस्वी चाचणी घेतली गेली आहे.