बातम्या शेअर करा

खेड – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे भागात 27 वर्षांपूर्वी एक खुनाचा गुन्हा घडला होता यामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी अनेक वर्ष फरार होता. मात्र खेड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार खेड पोलिसांनी फरार असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेश मधून ताब्यात घेण्यात यश आले. खेड पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे खेड पोलिसांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

आरोपी आणि मयत व्यक्ती लोटे येथील एका कंपनीत कामाला होते. सदर आरोपी याने रागाच्या भरात मयत सखाराम मांजरेकर याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केले म्हणून सदरचा गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाणे येथील अधिकारी यांनी प्रलंबित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एक पथक तयार केल आहे. त्यामध्ये खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुजित सोनावणे, अजय कडू, वैभव ओहोळ, राम नागुलवर, तूषार झेंड यांनी ही मोलाची कामगिरी बजावली. सुमारे 27 वर्षापासून फरारी असणारा आरोपी सुरेश चंद्र राम खीलवान याचा त्याच्या छीमी पुरीइन ता. खागा जिल्हा. फतेहपुर राज्य. उत्तरप्रदेश येथे जाऊन त्याला ताब्यात घेण्यात त्यांना यश आले.

सदर आरोपी इसम यांच्याकडे केलेल्या चौकशीत लोटे MIDC मधील कंपनीत नोकरीस असताना त्याने खेड पोलीस ठाणे गु. र. नंबर 152/1996 भा.द.वि.सं. कलम 302 प्रमाणे हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली असून नेमणुकीस असणारे तपास पथक हे सदर आरोपित इसम सुरेश चंद्र राम खीलवान वय – 50 वर्षे यांचे समवेत खेड पोलीस ठाणे येथे येण्याकरीता रवाना झालेले आहेत. हा आरोपी हा गुन्हा केल्यापासून आपले अस्तित्व लपवून वेळोवेळी ठिकाणे बदलून वास्तव्य करत असल्याचे तसेच त्याने सण-2008 मध्ये स्वतःचा बनावट मृत्यू दाखला बनवून तो मयत झाल्याचे भासवून लपून राहत असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here