बातम्या शेअर करा

चिपळूण – मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट 25 एप्रिल 2023 ते 10 मे 2023 या कालावधीत दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत असून बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतुक चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वळविण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जारी केले आहेत.


पनवेल-महाड-पणजी रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या परशुराम घाट मधील लांबी मधील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामापैकी 1.20 किमी लांबी ही उंच डोंगर रांगा व खोल दऱ्या असल्याकारणाने चौपदरीकरणाचे काम अवघड स्वरुपाचे आहे. या 100 मीटरमधील चौथ्या टप्याचे काम हे अवघड स्वरुपाचे असल्याने त्याठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेल्या मातीमुळे खाली कार्यरत महामार्गावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तसेच परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी व पुढील संभाव्य जीवित व वित्तहानी होवू नये म्हणून या प्रकल्पासाठी नियुक्त ठेकेदार यांनी या ठिकाणी काम करण्यासाठी परशुराम घाट वाहतुकीसाठी जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण-रायगड, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी, पोलीस विभाग व परिवहन विभाग यांनी संयुक्तपणे परशुराम घाटामध्ये वाहनांची वाहतुक सुरक्षितरित्या करण्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करुन त्यांच्या निरीक्षणाखाली परशुराम घाट 25 एप्रिल 2023 ते 10 मे 2023 या कालावधीत दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याबाबत आदेशित केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here