बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निश्चीत केलेली उद्दिष्ट पूर्ण केल्याने दि. २४ एप्रिल रोजी संकल्पपुर्ती आनंद मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या बहादुरशेखनाका चिपळूण येथील सहकार भवन मध्ये सकाळी १०.३० वाजता घेण्यात येणार आहे. हा मेळावा संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.


चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने ३० व्या वर्धापनदिनी १ हजार कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. या सप्टेंबर ते नोव्हेंबर या तिमाहीमध्ये एकूण ठेवीमध्ये ६७ कोटी ७६ लाख रुपयांची वाढ करून सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात एकूण १२७ कोटीने ठेवी व ८० कोटीने कर्जव्यवहार वाढीची संस्थेच्या ३० वर्षाच्या कालखंडातील विक्रमी वाढ झाली आहे. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था नियोजित कामकाज पूर्ण करताना विविध उपक्रम घेत असते अशाच प्रकारे पूढील वर्षाचे नियोजन करताना सन २०२२-२३ चा संकल्पपुर्ती आनंद मेळावा व या आर्थिक वर्षातील पहिला ग्राहक मेळावा आयोजनाचे ठरविलेले आहे. सदर मेळाव्याला व्हिजन २०२४ चे संकल्पचित्राचे अनावरण करणेत येणार आहे. यावेळी निवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोदयोग मंत्रालय, मुंबई एस. बी. पाटील व जिल्हा उपनिबंधक सह संस्था, रत्नागिरी डॉ. सोपान शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली आहे.

तरी सर्व सभासद, ग्राहक व समन्वयक यांनी सदर मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here