गोशाळा जागेसाठी भगवान कोकरे महाराज यांचे आमरण उपोषण सुरू

0
326
बातम्या शेअर करा

खेड –

खेड तालुक्यातील लोटे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान सांलित गोशाळाया जागा प्रश्न न सुटल्याने या गोशाळेचे पमुख भगवान कोकरे यांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपेषणाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.

या गोशाळेत सध्या अकराशे गाई आहेत. सध्या त्यांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. कीर्तनसेवेतून या गाईंची सेवा केली जाते. मात्र त्यांचा दिवसाचा खर्च ६० हजारांच्या आसपास जातो. त्यामुळे हा खर्च परवडत नसून गेल्या दोन वर्षापासून शासनाने कुठलीही मदत दिलेली नाही.
गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत जाहीर अनुदानातील शेवटचा हप्ताही अजून मिळालेला नाही. त्यामुळे अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यात गेल्या अनेक वर्षापासून या गोशाळेला जागा पाठपुरावा सुरू आहे., तोही सुटत नाही. यासाठी फेबुवारी महिन्यात उपोषण केल्यानंतर शासन स्तरावरून जागा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचे पालन झाले नसल्याने पुन्हा उपोषण करण्याचे श्री. कोकरे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार हे उपोषण सुरू झाले आहे. या उपोषणात जयश्री कोकरे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले आहेत. तसा अनेक गोभक्तांसह लोकपतिनिधींनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. राज्य वारकरी सांपदायाचे प्रमुख बंड्यातात्या कराडकर यांनी गोशाळेला मदत आणि जागा पश्न का सोडवत नाही असा पश्न पत्राव्दारे शासनाला केला आहे. तसा कोकरे यांना पत्र पाठवून उपोषणाला पाठिंबा असल्याचे कळविले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here