चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील दाभोळ खाडी सध्या एका ड्रेजरद्वारे वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार जिल्हा अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे सीलबंद असलेल्या ट्रेझर मधून वाळू उपसा होतो कसा.? असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडीतील ङ्रेजरद्वारे वाळू उपसा करण्याची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपलेली आहे. असे असताना मात्र दाभोळ खाङीमध्ये ङ्रेजरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू झाला आहे.वाळूने भरलेल्या मोठ्या बाजची वाहतूक सुरू झाली असुन आता ह्या व्यवसायाला प्रशासनाने मंजुरी कशी दिली असा सवाल केला जात आहे.
गोवळकोट भागात काही हातपाटी धारकाचे परमिट चालू आहे.त्यावर स्थानिक प्रशासन बारीक नजर ठेवत काम करते. मात्र ङ्रेजरद्वारे होणारे उत्खनन व करण्यात आलेला साठा गोवळकोट नदी काठी केलेला साठा पाहाता खाङीच खरङवून काढण्याचे काम सुरू आहे.सायंकाली ६ वाजल्यानंतर वाळू उपसा व वाहतुक पूर्णपणे बंद करण्याचे प्रशासनाचे आदेश असताना खुलेआम सर्व नियम धाब्यावर बसवून वाळू व्यवसाय सुरू आहे. याबाबत गोवळकोट येतील सुरेश कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
जर ड्रेजर सील केला तर नक्की काय केलं जातं….
वाळू उपसा करण्याच्या मुदतीनंतर त्या परिसरातील ड्रेजर हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली खाडीकिनारी आणून सील बंद केला जातो. त्यानंतर हा ड्रेजर खाडीच्या किंवा समुद्राच्या मध्यभागी न लावता खाडीच्या एका किनाऱ्याला लावला जातो. जेणेकरून नौकांनयन करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही… तसेच या ड्रेजरचे सील परस्पर कुणी तोडलं तर त्याच्यावर फौजदारीची कारवाई केली जाते.