गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतात. त्यामुळे आई वडील नातेवाईक त्यांना चॉकलेट घेऊन देतात. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
9 महिन्याच्या बाळाच्या घशात जेलीचे चॉकलेट अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. श्वास घेता न आल्यामुळे बाळाचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गुहागर तालुक्यातील साखरीआगर गावातील ही दुदैवी घटना घटना आहे. बाळाच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी गावातील डॉक्टरकडे नेले. मात्र, येथील डॉक्टरच्या सल्ल्यावरुन त्याला घोणसरे येथे नेत असताना रस्त्यातच या बाळाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी गुहागर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रिहांश तेरेकर असे मृत बाळाचे नाव आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्या चॉकलेट देत आहोत, तसेच ते चॉकलेट खाण्यायोग्य ते बाळ आहे की नाही, तसेच लहान वयाच्या पाल्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे, असे या आवाहन या घटनेनंतर केले जात आहे.