गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी हे मध्यवर्ती ठिकाण याच ठिकाणी सध्या विकृत आणि या गावातील अनेकांना शरमेने मान खाली घालावी लागेल असे चित्र सध्या दिसत आहे. या गावातील अनेक भिंतीवर काही विकृत तरुण विचित्र प्रकारचे चित्र काढून सामाजिक स्वास्थ बिघडवत आहेत….
या गावातील महत्त्वाच्या भिंतीवर अज्ञात तरुणांनी विकृत स्वरूपाचे पेंटिंग करून अबाल वृद्धांच्या, महिलांच्या मनात लज्जा निर्माण होईल अशा प्रकारचे शब्द वापरून घृणास्पद प्रकार चालू झालेले आहेत.. या बाबींवर लगेच आवर घातला नाही तर भविष्यात हे जागोजागी पाहायला मिळेल.. तेव्हा येतील लोकप्रतिनिधी ,पुढारी, स्वयंसेवक यांनी याबाबत त्वरित लक्ष घालून हे भयानक प्रकार थांबवावेत अशी मागणी आता सगळेजण करत आहेत….