चिपळूण ; अवघ्या तीन मतांची आघाडी घेत त्यांनी पटकावले सरपंचपद

0
529
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील गुढे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये थेट सरपंच पदाच्या लढतीमध्ये नरेश विठ्ठल टोले हे अवघ्या तीन मतांनी निवडून आले आहेत.

किशोर गांधी आणि नरेश टोले यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली.नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काही ग्रा.पं. बिनविरोध झाल्या. तर काही ग्रा.पं.मध्ये फक्त थेट सरपंच पदाच्या लढतीसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये शिरगाव, नारदखेरकी, गुढे ओमळी, बामणोली या प्रतिष्ठेच्या ग्रा.पं.मध्ये चौरंगी तर काही पंचरंगी लढती पहावयास मिळाल्या. तालुक्यातील गुढे ग्रा.पं.मध्ये सरपंच पदासाठी नरेश विठ्ठल टोले, किशोर गांधी व केदार जोगळे यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत नरेश टोले (२७५ मते), किशोर गांधी (२७२) तर केदार जोगळे (२४०) अशी मते मिळाली. यात नरेश टोले यांनी अवघ्या तीन मतांची आघाडी घेत सरपंच पदाचा बहुमान पटकावला. नूतन सरपंच नरेश टोले यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. मात्र, गुढे ग्रा.पं.मध्ये तीनही प्रभागांमधील सदस्य बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये ऋतिका विनोद जाधव, विजय तुकाराम जाधव, वृषाली अरविंद कदम, आत्माराम गंगाराम कदम, मानसी भरत गांधी, अल्पेश सिताराम मोरे व मीरा मधुकर बुदर हे उमेदवार सदस्य म्हणून निवडून आले आहेत. रामपूर जि.प. गटातील गुढे हे सर्वात मोठे गाव असल्याने या गावचा विकास करण्याचे शिवधनुष्य नरेश टोले यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे गावातील विकासकामे करताना सर्व घटकांना प्राधान्य देत विकास करणार असल्याचे नरेश टोले यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here