चिपळूण – चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हणे-सुतारवाडी येथे बोलेरो आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात चिपळूण शहरातील मुरादपुर मधील समीर मन्सूरी या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. मुरादपूर येथे आई, वडील आणि बहीण असा समीरचा परिवार आहे. वडिलांचे कुशनिंगचे दुकान आहे. या दुकानात तो वडिलांना हातभार लावत असे. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच चिपळूण मधील अनेकांनी मार्गताम्हाणेकडे धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. समीरच्या दुर्देवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.