गुहागर – गुहागर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पाटपन्हाळे हि ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदावर महाविकास आघाडीचे विजय तेलगडे हे निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचे अनेक सदस्य ही निवडून आलेत. मात्र काही जण या ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी असताना शिवसेनेचे सदस्य निवडून आले नाहीत असा बिनबुडाचा आरोप करत आहेत. कारण याच पाटपन्हाळे ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडी कडून जी निवडणूक पार पडली त्यामधून मीही निवडून आलेली आहे आणि मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे सदस्य आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये सुद्धा मी शिवसेनेची सदस्य म्हणून निवडून आलेली आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी ज्या बातम्या पेरल्या जातात त्या धंद्यात खोट्या असल्याचा आरोप सिद्धी जाधव यांनी केलाय. आगामी काळात या ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विकास काम करण्यावर आपण भर देणार असल्याचे सुद्धा त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटला आहे.