बातम्या शेअर करा

चिपळूण – मे. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या ‘मिल्क पाऊच’ च्या प्रोसेसिंग युनिटचा शुभारंभ चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. नंतर ‘वाशिष्ठी मिल्क पाऊच’ चे शानदार लॉंचिंग करण्यात आले.

यावेळी वाशिष्ठी डेअरीचे संचालक प्रशांत यादव व संचालिका सौ. स्वप्ना यादव यांच्यासह उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. यानंतर वाशिष्ठी दूध शुक्रवारपासून बाजारपेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहे.कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक प्रशांत यादव व चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी मनाशी बाळगून पिंपळीखुर्द येथे वाशिष्ठी डेअरीची मुहूर्तमेढ रोवली आणि हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून गुरुवारी रात्री ‘मिल्क पाऊच’ च्या प्रोसेसिंग युनिटचा शुभारंभ झाला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले इतकेच नव्हे तर आनंदोत्सव साजरा केला. यावेळी वाशिष्ठी डेअरीचे संचालक प्रशांत यादव व संचालिका सौ. स्वप्ना यादव यांनी या प्रकल्पासाठी आतापर्यंत सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानत वाशिष्ठी दूध ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास व्यक्त करतांना ग्राहकांनी या प्रकल्पाला साथ द्यावी, असे आवाहन केले.

यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टसचे संचालक प्रशांत यादव, संचालिका सौ. स्वप्ना यादव यांच्यासह चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, ऍड. नयना पवार, संचालक अशोक साबळे, कु. स्वामींनी यादव, महेश खेतले, प्रशांत वाजे, संदीप पाटील, अविनाश गुढेकर तसेच वाशिष्ठी डेअरीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here