गुहागर तालुक्यातील असगोली येथील गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे तालुक्यातील दिव्यांगांची सहल आयोजित करण्यात आली होती.
या संस्थेचे कार्यालय वरवेली येथून या सहलीला सुरुवात झाली. या सहलीचा ६३ दिव्यांगांनी आनंद घेतला. वरवेली हेदवी – तावसाळ- फेरी बोट मार्गे जयगड- जयगड किल्ला लाईट हाउस गणपती मंदिर गणपतीपुळे प्राचीन कोकण म्यजीकगार्डन मत्स्यालय व संग्रहालय अशी सहल काढण्यात आली. दिव्यांगांना मुक्तपणे फिरता यावे व त्यांच्यामधील न्यूनगंड कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी संस्थेकडून नेहमीच प्रयत्न होत आहेत. या सहलीसाठी अशोक भुस्कुटे, नीलेश सुर्वे, डॉ. योगेश मोकल, एस. सरदेसाई, गणेश धुरी, अपंग मित्र अशोक भुस्कुटे यांनी सहकार्य केले. या सहलीसाठी नियोजन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणग यांनी केले. सहल यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश अनगुडे, खजिनदार सुनील मूकनाक, संचालक अनिल जोशी, संगम रावनंग, कोमल शिंदे आदींनी प्रयत्न केले..