चिपळूण – आजच्या संगणकच्या युगात लहान मुले तासन तास हातात मोबाईल घेऊन बसलेले असतात त्यामुळे मैदानी खेळात भाग घेताना ते सर्हास दुर्लक्ष करताना दिसतात .
मुलांना मैदानी खेळाची आवड लहान पणापासूनच लागावी व उत्तम आरोग्याचा महत्व योग्य वेळी कळावे या साठी सालाबाद प्रमाणे बालदिनानिम्मित चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे यावर्षीही चिपळूण येथे ५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी KIDS CYCLOTHON -२०२२ च नियोजन करण्यात आले होते.या CYCLOTHON साठी चिपळूण व खेड तालुक्या मधील विविध भागातून जवळपास ३० पेक्षा जास्त मुलांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता.सदर CYCLOTHON हि २० किलोमीटर अंतराची होती ज्याची सुरवात सकाळी ६ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र इथून डॉ वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आली. CYCLOTHON चा मार्ग हा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र – बहादुरशेख नाका – पेढांबे ब्रिज – बहादुरशेख नाका – इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असा होता.यामध्ये सर्व मुलां सोबत त्यांचे पालक व चिपळूण सायकलींग क्लबचे सर्व सदस्य सायकल वरून त्यांच्या सोबत होते. CYCLOTHON चा २० किलोमीटरच अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व मुलांना फिनिशर मेडल देऊन गौरवण्यात आले.तसेच सायकलिंग क्षेत्रात कोणकोणत्या स्पर्धा होतात व त्याचे तंत्र शुद्ध पद्धतीने प्रशिक्षण कसे घेतले जाते या विषयावरती चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्य मार्फत सर्व मुलांना मार्गर्दर्शन करण्यात आले.CYLOTHON च्या सांगतेवेळी पालकांकडून खूप साऱ्या चांगल्या प्रतिक्रिया या वेळी क्लब च्या सदस्यांना मिळाल्या व भविष्यात असे उपक्रम घेऊन मुलं मध्ये लहान वयात शरीर तंदुरुस्त राहायची सवय लागावी या साठी विनंती करण्यात आली.चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे गेल्या ३ वर्ष मध्ये हा ७ वा यशस्वी असा सायकलिंग चा उपक्रम/स्पर्धा आपल्या तालुक्यात घेतला गेला आहे. तसेच भविष्यात चिपळूण तालुक्यात सायकलिंगचा प्रसार व्हावा व आपल्या आरोग्य तंदुरुस्त राहावे या साठी क्लब मार्फत असे उपक्रम सातत्याने घेतले जातील असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.