इंफिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात डोळ्यांचे तपासणी शिबिर

0
68
बातम्या शेअर करा

चिपळूण – रत्नागिरीतील सुप्रसिद्ध इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलतर्फे पुढील सात दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणी मधुमेह असणाऱ्यांच्या डोळ्यांच्या पडद्याची तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

त्यानुसार १४ रोजी संगमेश्वर येथील नावडी ग्रामपंचायत, १५ रोजी लांजा येथील संकल्प सिद्धी सभागृह, १६ रोजी चिपळूण येथील स्प्रींग्ज क्लिनिक, १७ रोजी राजापूर येथील डॉ. जोशी हॉस्पीटल, १८ रोजी खेड मधील डॉ. धारिया हॉस्पीटल, १९ रोजी दापोली हर्णे येथील हर्णे माळेकर सभागृह तर दि. २० रोजी साखरपा येथील नाना शेट्ये सभागृहात हे शिबीर होणार आहे, अशी माहिती डॉ. श्रीधर ठाकूर यांनी चिपळूण मधली पत्रकार परिषदेत दिली.रक्तातील सततच्या अनियंत्रित साखरेच्या पातळीमुळे डायबेटिस असणाऱ्यांच्या डोळ्याचा पडदा, किडनी, हृदय, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांवर दीर्घकालीन दुष्परीणाम होतात. डोळ्याच्या पडद्यावर साखरेमुळे होणारे पा हळूहळू दृष्टीनाश घडवून आणतात. यामुळे खालील समस्या उद्भवतात… डोळ्यात वारंवार जंतुसंसर्ग होणे. तरुण वयात मोतीबिंदू होण्याची शक्यता. पडद्यावरील रक्तवाहीन्यांची हानी होऊन त्या ठिसूळ होणे. अशा ठिसूळ रक्तवाहीन्या साध्या खोकण्या अथवा शिंकण्याने सुद्धा क्वचित प्रसंगी फुटू शकतात व डोळ्यात रक्तस्त्राव होतो. पडद्याला सूज येणे व छिद्र पडणे किंवा पडदा सरकणे. डायबेटीसमुळे होणारा दृष्टीनाश कायम स्वरूपी असतो व ही हानी कधीही भरून येत नाही. पुष्कळ वेळेस डायबेटीस असण्याऱ्या व्यक्तिंच्या डोळ्यांची हानी ही वेळीच लक्षात येत नाही व जेव्हा लक्षात येते तेव्हा उशीर झालेला असतो. डोळ्यात थेंब घालून पडद्याची तपासणी व डोळ्याचा ३D स्कॅन करून पडद्याचे झालेले नुकसान तपासून घेता येते व पुढील उपचार करता येतात. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोळे व रेटीना यावरील सुपर स्पेशालिटी सुविधा फक्त इन्फिगो मध्येच उपलब्ध आहेत, रेटीनाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व लेझर उपचार सुप्रसिध्द रेटीना तज्ञ डॉ. प्रसाद कामत यांच्या वैयक्तिक सल्ल्याने केले जातात. डॉ. प्रसाद कामत, ‘शंकर नेत्रालय’ चेन्नई येथून प्रशिक्षित आंतरराष्ट्रीय किर्तीचे रेटीना तज्ञ आहेत. डायबेटीस असणाऱ्या सर्वांची गैरसोय लक्षात घेऊन रेटीना तज्ञ आपल्या गावांत’ या अभियानाद्वारे ‘इन्फिगो’ चे प्रसिद्ध रेटीना स्पेशालिस्ट डॉ. प्रसाद कामत स्लिट लॅम्प व 10 पद्धतीने पडद्याची तपासणी व उपचार करणार आहेत. या ठिकाणी अत्याधुनिक जर्मन 3D स्कॅन आणण्यात येणार असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यास डोळ्याच्या पडद्याचा ३D स्कॅन रु. ३०००/- ऐवजी शिबिराच्या दिवशी फक्त रु. २०००/- इतक्या सवलतीत करण्यात येणार आहे. तरी आपणा सर्वांनी नोंदणी करून या अमूल्य संधीचा लाभ घ्यावा. रेटीना तज्ञांद्वारे तपासणी केले जाणारे हे शिबिर आपल्या गावात पहिल्यांदाच होत आहे. या तपासणीसाठी साधारण ४५ मिनिटे लागतात. त्यामुळे पूर्व नोंदणी आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी ९३७२७६६५०४, ९३७२७६६५०८, ९१३७१५५४९० येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here