गुहागर – गुहागर चिपळूण मार्गावरील चिखली येथे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला त्या आरोपीला अखेर चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला शोधून काढले.
गुहागर – चिपळूण मार्गावरील चिखली येथे आरोपीने पोलिसांना चकवा देत जंगलात पलायन केले होते. त्यानंतर हा संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अखेर त्या आरोपीला चिखली मधील देवराठी लपून बसलेल्या एका ठिकाणाहून ताब्यात घेतले.
गुहागर पोलीस आज एका आरोपीला चिपळूण कोर्टामध्ये हजर करून पुन्हा गुहागर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन येत असताना आरोपीने चिखली येथे पोलिसांना चकवा देत पळ काढल्याने एकच खळबळ उडाली होती.
गुहागर – चिपळूण मार्गावरील चिखली येथे आरोपीने पोलिसांना चकवा देत जंगलात पलायन केले होते. काल सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या आरोपीला गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस दुचाकीवरून चिपळूण वरून गुहागरला आणत असताना ही घटना घडली.
त्यासोबत ही बातमी पण पहागुहागर ;.. आणि आरोपीने केले पोलिसांच्या तावडीतून पलायन
निगुंडळ येथील शिवराम नारायण साळवी हा संशयित आरोपी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्यासाठी अटक होता. त्याला चिपळूण न्यायालयामध्ये हजर करण्याकरता गुहागर मधील पोलीस दुचाकी वरून घेऊन गेले होते. चिपळूण वरून पुन्हा परत आणत असताना चिखली स्टॉपच्या दरम्याने आपल्याला लघुशंकेसाठी आरोपीने थांबवण्यास सांगितले. त्याप्रमाणे पोलीस यांनी दुचाकी थांबवली. मात्र या आरोपीने तेथून पलायन केले आहे. चिखली येथे जवळच दाट जंगल असल्याने त्यांनी त्या जंगलात पलायन केले. या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली असून सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते. यावेळी चिखली येथील विशाल कदम ,प्रदीप खैर ,प्रकाश कदम ,उमेश गुरव ,बाबा कदम आदी ग्रामस्थ आणि चोराला शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.