बातम्या शेअर करा

खेड – खेड तालुक्यात आज परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असल्याने निसरड्या झालेल्या रस्त्यावरून दगडी कोळसा वाहू ट्रक उलटून अपघात झाला.

कशेडी घाटात झालेल्या या अपघातात चालकाचे दैव बलवत्तर म्हणून तो सहीसलामत बचावला. अपघातानंतर कशेडी घाटात वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महाडवरून लोटे औद्योगीक वसाहतीत दगडी कोळसा घेऊन जाणारा ट्रक कशेडी घाट उतरत असताना सुरु असलेल्या धुवाधार पावसामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक काळकाई मंदिराजवळ पलटी झाला. या अपघातात ट्रकचा चालक मात्र आश्चर्यकारकरीत्या बचावला. आज सकाळी दहा वाजल्यापासून खेड तालुक्यत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने महामार्ग निसरडा झाला आहे. शिवाय घाटात पावसामुळे निर्माण झालेल्या धुक्यामुळे वाहने हाकताना चालकांचा कस लागत आहे. कशेडी घाटात अपघातग्रस्त झालेल्या ट्रक हा महाड येथून दगडी कोळसा घेऊन खेड तालुक्यातील लोटे औद्योगीक वसाहतीत येत होता. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हा ट्रक कशेडी घाट उतरत असताना पाऊस कोसळतच होता. पावसामुळे घाटात धुके निर्माण झाले होते. आणि रस्ताही निसरडा झाला होता त्यामुळे चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि तो ट्रक रस्त्यात पलटी झाला. या अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. महामार्गावरून प्रवास करणारे अनेकजण अडकून पडले, अपघाताची खबर मिळताच कशेडी टॅप चे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान खेड पोलीस देखील घाटात दाखल झाले होते. रस्त्यात पलटी झालेल्या ट्रक क्रेनच्या सहाय्य्यने बाजूला करून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here