बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर पोलीस आज एका आरोपीला चिपळूण कोर्टामध्ये हजर करून पुन्हा गुहागर पोलीस ठाण्यामध्ये घेऊन येत असताना आरोपीने चिखली येथे पोलिसांना चकवा देत पळ काढल्याने एकच खळबळ उडाली असून सध्या आरोपीची शोधाशोध सुरू आहे.

गुहागर – चिपळूण मार्गावरील चिखली येथे आरोपीने पोलिसांना चकवा देत जंगलात पलायन केले आहे. आज सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या आरोपीला गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस दुचाकीवरून चिपळूण वरून गुहागरला आणत होते अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून गुहागर पोलीस चिखली पंचक्रोशीतील परिसरामध्ये त्याचा शोध घेत आहेत.

निगुंडळ येथील शिवराम नारायण साळवी हा संशयित आरोपी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्यासाठी अटक होता. त्याला आज चिपळूण न्यायालयामध्ये हजर करण्याकरता गुहागर मधील पोलीस दुचाकी वरून घेऊन गेले होते. चिपळूण वरून पुन्हा परत आणत असताना चिखली स्टॉपच्या दरम्याने आपल्याला लघुशंकेसाठी आरोपीने थांबवण्यास सांगितले. त्याप्रमाणे पोलीस यांनी दुचाकी थांबवली. मात्र या आरोपीने तेथून पलायन केले आहे. चिखली येथे जवळच दाट जंगल असल्याने त्यांनी त्या जंगलात पलायन केले आहे. या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली असून सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here