रत्नागिरी ; १३६ वाहनांची नोंदणी बोगस

0
92
बातम्या शेअर करा

रत्नागिरी – राज्यातील अन्य आरटीओ विभागातील काही एजंटच्या हुशारीने झालेल्या बोगस वाहन नोंदीचे लोण रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही पसरले आहेत.

ऑनलाईन नोंदणीतील पळवाट शोधत चेसीस नंबरमध्ये जादा डॉट (स्टार किंवा अन्य कॅरेक्टर) टाकून वाहनांच्या बोगस नोंदणी करण्यात आल्या. यात जिल्ह्यातील १३६ वाहनांचा समावेश असून, ती भंगारात निघण्याची भीती आहे. या बोगस नोंदणीमुळे सुमारे १७ लाख ४९ हजारांचा टॅक्स आणि पसंती क्रमांकाचे आठ लाख ७९ हजार एवढा शासनाचा महसूल बुडाला. या प्रकरणी तिघांवर निलंबनाची कारवाई केली होती. यापैकी १०९ जणांनी टॅक्स भरला असून २२ जणांना टॅक्स भरण्याची अंतिम नोटीस बजावली आहे. बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे बोगस नोंदणी झाल्याची तक्रार परिवहन कार्यालयाकडे झाली होती. या तक्रारीनंतर राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची चौकशी केली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वाहनांच्या बोगस नोंदणी झाल्याचे उघड झाले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here