चिपळूण – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळत असल्याने चार दिवसापासून हा मार्ग बंद केला होता. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहने चिपळूण व लोटे येथे थांबवून ठेवली होती. मात्र शनिवारी पावसाचा जोर कमी होताच थांबवलेली वाहने परशुराम घाटातून एकेरी पद्धतीने सोडण्यात आली. त्यामुळे चार दिवस अडकून पडलेल्या वाहतुकदारांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, परशुराम घाट नियमित वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत उशिरा पर्यंत निर्णय झाला नव्हता.
हा घाट आता सुरू जरी गेला असला तरी आज रात्री बारा वाजल्यापासून पुन्हा 12 तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद राहणार आहे.