मुंबई – एकनाथ शिंदे तुम्हाला हे शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत. शिवसेनेचे रक्तपात होईल शिवसेना संपेल. तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री झाला म्हणून आनंद व्यक्त करतो.
पण शिवसेना कशी वाचवायची यासाठी तुम्ही दोन पाऊले मागे या आणि शिवसेना वाचवा असे शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन करताना भाजपवर चांगलेच संतापले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सरकार बहुमताने आलं असून त्याच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना भास्कर जाधवांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपचा एक कलमी कार्यक्रम हा शिवसेना संपवण्याचा आहे. शिंदेंद्वारे शिवसेनेत लढाई सुरु केली आहे. या लढाईमध्ये शिवसेना संपेल, शिवसेनेत रक्तपात होईल, शिवसेना वाचवण्यासाठी परत या असे आवाहन भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. विधानसभा सभागृहात भास्कर जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही सांगतात की मी शिवसेनेचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगायचे आहे. मुख्यमंत्री झालात तुमच्यावर जबाबदारी आली आहे. आपण शिवसेना प्रमुखांचे नाव घेताल शिवसैनिक आहात. तुमची माझी उठबस झाली नाही. दोन टर्म समोरासमोर येत होतो. तिरकी मान करुन चालता, पुन्हा शिवसेनामध्ये आल्यावर गटनेते पदी निवड झाल्यावर सत्कार केला. नंदनवन बंगल्यावर दोन वेळा, एमएसआरडीसीमध्ये दोन वेळा भेट झाली. मंत्रालयात कधी भेट झाली नाही. कोकणात जेव्हा पूर आला तेव्हा खऱ्या अर्थाने शिवसैनिक आणि वारसदार दिसला असे भास्कर जाधव यांनी शिंदेंच्या अभिनंदन प्रस्ताववर म्हटलं आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला हे शिवसेना विरुद्ध शिवसेना असे लढवत आहेत. शिवसेनेचे रक्तपात होईल शिवसेना संपेल. तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री झाला म्हणून आनंद व्यक्त करतो. पण शिवसेना कशी वाचवायची यासाठी तुम्ही दोन पाऊले मागे या आणि शिवसेना वाचवा. यांचा २५ वर्षांचा एक कलमी कार्यक्रम हा शिवसेना संपवण्याचा आहे. तुमच्याबद्दल यांना काही प्रेम आले नाही असे अनेक उदाहरण तुम्हा सांगू शकतो असे शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले आहेत.