चिपळूण – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील कॉक्रीटवर तडे गेल्याचे समोर आलेले असतानाच गुरूवारी झालेल्या हलक्याच्या पावसात पेढे सवतसडा येथील नव्या मोरीचा एका बाजूचा भराव ढासळला आहे.
कंत्राटदार कंपणीकडून डागडूजीचे काम हाती घेण्यात आले आहे. महामार्गावर परशुराम ते लोटे आणि कापसाळ ते कामथे या खेड आणि चिपळूण टप्प्यातील चौपदकरणात करण्यात आलेल्या काँक्रटीकरणास जागोजागी तडे गेले आहेत तर काही ठिकाणी महामार्ग खचलाही आहे. त्यामुळे कामे पुर्ण करण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. असे असतानाच मंगळवारी पडलेल्या पावसात सवतसडा येथील मोरीचा एका बाजूचा भराव ढासळला आहे. महिनाभरापूर्वीच या मोरीचे काम पुर्ण करून त्यावर काक्रीटकरण करण्यात आले आहे. एका बाजूचा मातीचा भराव ढासळला असला तरी त्यामुळे काक्रीटकरणाला कोणताही धोका नसल्याचे राष्ठ्रीय महामार्गचे अभियंता तसेच कंत्राटदार कंपणीचे म्हणणे आहे. दरम्यान भराव ढासळलेल्या ठिकाणी कंत्राटदार कंपणीकडून उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.