राज्याचा इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाला असून दरवर्षी प्रमाणे यंदाची कोकण विभागानं बाजी मारली आहे.
कोकण विभागातून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. तर राज्याचा निकाल एकूण ९६.९४ टक्के इतका लागला आहे. आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाची सविस्तर माहिती दिली. आता दुपारी १ वाजत विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे.
विभागानुसार लागलेले निकाल टक्केवारी…पुणे: 96.96%नागपूर: 97%औरंगाबाद : 96.33%मुंबई: 96.94%कोल्हापूर: 98.50%अमरावती: 96.81%नाशिक: 95.90%लातूर: 97.27%कोकण: 99.27%