गुहागर – गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचा इयत्ता १०वीचा निकाल १००टक्के लागला. चिराग सचिन साळवी याने ८८.८०टक्के गुण मिळवून प्रथम, ओमकार शिवराम साळवी याने ८३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर नुपुर दत्ताराम धनावडे हिने ८२.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.प्रशालेतून एकूण ७६विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामध्ये सर्वच्या सर्व ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये १७ विद्यार्थी विशेष श्रेणी ३८ विद्यार्थी प्रथम श्रेणी,१५ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ६ विद्यार्थी,उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन भालचंद्र चव्हाण व सर्व पदाधिकारी,तळवली गटविकास मंडळाचे अध्यक्ष विनायक मुळे व सर्व पदाधिकारी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप चव्हाण व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
देवघर आदर्श विद्यालय १०० टक्के निकाल गुहागर तालुक्यातील देवघर आदर्श विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ५३ विद्यार्थी उतीर्ण झाले. त्यामध्ये श्रुती सुरेश साटम (८९.४०%) प्रथम, सोनाली संजय सकपाळ (८९.२०%) द्वितीय तर स्वरा सचिन वंजारे (८८.२०%) तृतीय, तसेच अथर्व राकेश पारधी (८६.४०%), अवंतिका नरेश सकपाळ (८५.६०%), प्राची निलेश म्हामुणकर (८५.६०%) यांनी यश मिळवले.
श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरगुहागर येथील श्री.देव गोपालकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला. एकूण १९४ विद्यार्थी उतीर्ण झाले. मुद्रा वीरेंद्र चौगुले (९६.४०%) प्रथम, श्रुती संदेश पाटणे (९५.८०%) द्वितीय, तन्वी राजेंद्र बाणे (९५.२०%) तृतीय व गौरी प्रल्हाद विचारे (९५.२०%) यांनी चांगले गुण मिळवून यश प्राप्त केले.
न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळेगुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९५.९२ टक्के लागला असून १४७ पैकी १४१ विद्यार्थी उतीर्ण झाले. यामध्ये श्रावणी सुजित गमरे (८९.२०%) प्रथम, आर्या प्रकाश विचारे (८६%) द्वितीय , वेदांत सतीश मेस्त्री (८५.६०%) तृतीय यांनी यश मिळवले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी प्रथमेश गणेश खैरे याने ९४.८०% गुण मिळवून प्रथम, स्नेहा प्रवीण ओक (९१.६०%) द्वितीय, तर साहिल युनुस धामस्कर (९१.२०%) तृतीय यांनी यश मिळवले.