बातम्या शेअर करा

संगमेश्वर – मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे एक भरधाव क्वालीस कंटेनरवर समोरासमोर आदळून झालेल्या अपघातामध्ये एक महिला जागीच ठार झाली असून क्वालीस मधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत .

मुंबई मधील गोरेगांव येथून मालवण निघालेली क्वालीस संगमेश्वर येथे आली असता क्वालीसची समोरुन येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक बसली . या भिषण अपघातात क्वालीस मधील सीमा जगदीश पडवळ वय ५६ रा . गोरेगांव मुंबई या जागीच ठार झाल्या . तर क्वालीस मधील जगदीश ज्ञानदेव पडवळ वय ६० रा . सौरभ जगदीश पडवळ वय २५ दोन्ही रहाणार गोरेगांव , मुंबई हे गंभीर जखमी झाले . क्वालीसची कंटेनरला बसलेली धडक एवढी जोरदार होती की , क्वालीसची पुढील बाजू कंटेनरच्या खाली जावून सर्व प्रवासी आतमध्ये अडकून पडले होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here